चौफेर करीत असलेल्या कार्यामुळे सर्व स्तरातून वाढता पाठिंबा

अमळनेर : येथील अमळनेर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात एकूण नऊ उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याने नेमकी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार ? याविषयी तर्क केले जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते रणजित भास्कर शिंदे हे सहकार पॅनलचे अधिकृत उमेदवार असून विरुद्ध इतर आठ उमेदवार अशी लढत होत आहे. यामुळे या मतदारसंघातील निवडणूक चर्चेचा विषय ठरली असून सर्वांचे लक्ष लागून आहे. सहकार पॅनल ने त्यांची केलेली निवड सरस ठरवायची असेल तर ती सहकार पॅनलच्या बाजूने असणाऱ्या सर्वांचीच जबाबदारी आहे. राखीव मतदारसंघातील लढतीच्या केंद्रस्थानी प्रमुख उमेदवार म्हणून रणजित शिंदे हेच असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. असे असले तरी त्यांची लढत थेट सोमचंद संदानशिव, नरेश कांबळे , राजेंद्र परदेशी यांचेशी होत असल्याने रणजित भास्कर शिंदे यांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान व चौफेर कार्य जादू करणार का ? अशीही चर्चा आहे.

अर्बन बँकेचे स्व. संचालक शांताराम ठाकुर यांच्या रिक्त जागेवर मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या रणजित शिंदे यांना सत्ताधारी सहकार पॅनलच्या नेत्यांनी पॅनलमध्ये विचारपूर्वक समाविष्ट करून घेतले आहे. पॅनलच्या नेत्यांचा वरदहस्त, सहकारी तुल्यबळ उमेदवारांची साथ आणि शिंदे यांची उच्च शिक्षित, सततचे सामाजिक कार्य, विविध चळवळी, आंदोलन तसेच समाजोपयोगी उपक्रमांमधून निर्माण झालेल्या व्यापक लोकसंपर्कासह समन्वयाची भूमिका घेणारे व सकारात्मक व्यक्तिमत्व असलेले रणजित शिंदे हे प्रत्येक विरोधी उमेदवाराचे प्रमुख प्रतिस्पर्धी ठरलेले असून त्यांचे पारडे इतर उमेदवारांच्या तुलनेने जड आहे. एकंदरीत शिंदे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु असली तरी प्रत्यक्ष निकालच महत्वाचा ठरेल.