राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमळनेर शहराध्यक्षपदी घनश्याम जयवंतराव पाटील यांची नियुक्ती

अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरदचंद्रजी पवार यांचे हात बळकट करण्यासाठी जिल्हाभर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करून पक्ष वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अमळनेर शहराध्यक्षपदी नगरसेवक घनश्याम जयवंतराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते घनश्याम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस जळगावचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र प्रल्हादराव पाटील यांच्या सहीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

पुरोगामी विचारांनी झपाटलेले घनश्याम पाटील यांनी नेहमीच आपल्या कार्याचा ठसा उमटवून स्वतःला सिद्ध केले आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून ते निश्चितच पक्षाला बळ देतील. सामान्य जनतेपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे विचार पोहोचवून जनतेच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी आदर्श, आपुलकी, सहानुभूती व विश्वास निर्माण करतील. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यभर सर्वत्र पडसाद उमटले. शरदचंद्रजी पवार यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत आदरणीय शरद पवार हेच आमचे नेते आहेत. अशा कठीण परिस्थितीत त्यांना साथ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा भावना व्यक्त करत पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीचे असंख्य कार्यकर्ते पुढे येत आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!