अमळनेर पालिकेचे संदीप गायकवाड यांचेवर चाकूहल्ला; संशयित पोलीसांच्या ताब्यात

अमळनेर : येथील नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांचेवर काल ता.२ रोजी रात्री ११ चे सुमारास धुळे रस्त्यावर तीन हल्लेखोरांनी चाकूहल्ला केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धुळे रस्त्यावरील साई हॉटेलजवळ गायकवाड आपल्या गावी नाशिक जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभे होते. याचवेळी तीन जण मोटर सायकल क्र. एम.एच.१९- ७५०३ वर आले व त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करत चाकूहल्ला केला यात ते गंभीर जखमी झाले. घटनास्थळी असलेल्या सचिन पाटील, राहुल ठाकूर, रमेश जैन यांनी जखमी अवस्थेत त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन त्यांचेवर प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी धुळे येथील सेवा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आल्याचे कळते.

घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, शरद पाटील, मिलींद भामरे, ईश्वर सोनवणे, रविंद्र पाटील, दिपक माळी यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि या घटनेतील संशयितांना ताब्यात घेतले आहे. हल्लेखोरांची कसून चौकशी सुरु आहे. कुणाल शिंपी, राजेश उर्फ दादू धोबी, आकाश शिंदे अशी तीन संशयित आरोपींची नावे आहेत. संदीप गायकवाड यांचेवर झालेला हल्ला त्यांचे प्रामाणिक पणाला कंटाळलेल्या लोकांनी ठरवून केला असल्याची चर्चा सुरु आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!