
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील क्रांतीसुर्य प्रतिष्ठान व मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त येथील नवीन क्रीडा संकुलात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सामाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या तसेच लेखनातून प्रबोधन करणाऱ्या व्यक्तींना सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात, कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक सोपान भवरे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सेवा पुरस्कार २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीपनगरचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. जतीन मेढे होते. यावेळी आयोजक अभियंता मोहन सरदार, मिलिंद खंजिरे, संदीप वाघ, विजया बोरकर, रवींद्र सोनकुसरे, योगेश इंगळे, संजय हिवरे, रवींद्र डांगे, डॉ. कल्पना बावा आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जिल्हास्तरावर सामाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा तसेच लेखनातून प्रबोधन करणाऱ्या व्यक्तींना क्रांतीसुर्य प्रतिष्ठान व मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ यांच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. श्री सोपान भवरे हे हिंदी अध्यापक मंडळात पदाधिकारी आहेत. शाळेतील विविध उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. त्यांना मिळालेल्या सेवा पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन..!
