बाल मेळावा अंतर्गत बाल साहित्यिकांनी केलेल्या सादरीकरणात शारदा माध्यमिक विद्यालयाची ‘कर्मयोगी साने गुरुजी’ नाटिका ठरली लक्षवेधी

अमळनेर (सानेगुरूजी साहित्य नगरी) : येथील ९७ वेळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात झालेली आहे. या संमेलनाच्या पुर्वसंध्येला बाल मेळावा अंतर्गत बाल साहित्यिकांनी कथाकथन, काव्य वाचन, नाट्य प्रवेश सादर केले होते. यातील निवडक बालकांना खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठ येथे आपली कला सादर करण्याची संधी देण्यात आली. काल झालेल्या कथाकथन सत्रात एकूण ६ कथाकथनातून २ निवडक आकांक्षा पाटील व गार्गी सुनिल जोशी या विद्यार्थिनींची निवड करण्यात आली होती. काव्यवाचनात एकूण ९ काव्यवाचनातून ओवी तुषार चांदवडकर व प्रांजल अमोल सोनवणे यांची सादरीकरणासाठी निवड करण्यात आली होती. नाट्यप्रवेश एकूण ७ नाटय प्रवेशातून संस्कृती पवनीकर,जळगाव व शारदा माध्यमिक विद्यालय,कळमसरे या टीमची निवड करण्यात आली. यानंतर निवड झालेल्या बलसागर भारत होवो पीबीए इंग्लिश मिडीयम स्कूल, अमळनेर संघाने सादर केले.

बालसाहित्यातील या वर्षाचा भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालमेळावा समन्वयक एकनाथ आव्हाड यांचा सत्कार बालमेळावा आयोजकांनी केला. यामध्ये कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालय व एन. एम कोठारी कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी बाल मेळाव्यासाठी साने गुरुजींच्या जीवनावर ‘कर्मयोगी साने गुरुजी’ नावाचे सुंदर नाटक सादर केले. या नाटकाचे लेखन कळमसरे शाळेतील उपक्रमशील शिक्षक, लेखक, कवी, पत्रकार सोपान भवरे यांनी केले आहे. या नाटिकेत साने गुरुजींचे मार्मिक प्रसंग मांडले होते. या नाटकात साने गुरुजींची प्रमुख भूमिका नितीन मजगे या विद्यार्थ्याने त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांची भूमिका संजोग सोनवणे याने तर भारत मातेची भूमिका मानसी पवार यांनी साकारलेली होती. निवेदक म्हणून प्रगती पाटील आणि प्रिया कोळी या मुलींनी काम पाहिले. ग्रामीण भागातून सादर होणारी ही एकमेव नाटिका होती. खेड्यातील मुलांच्या कल्पकतेला वाव मिळावा या हेतूने ही नाटिका तयार केली होती. शाळेतील प्रशासन अधिकारी जी. टी. टाक यांनी सहकार्य केले .ह्या नाटिकेच्या सरावासाठी आर. जी. राठोड व एम. आर. तडवी यांनी मेहनत घेतली. शाळेचे अध्यक्ष व संचालक मंडळ तसेच रसिक मंडळीकडून कौतुक करण्यात येत आहे.

समारोपीय भाषणात एकनाथ आव्हाड यांनी बाल साहित्यिकांनी सादर केलेल्या कलाप्रकराचे कौतुक केले. आजच्या बाल मेळाव्यातील साहित्यातून उद्याचे दर्जेदार साहित्य घडतील असा आशावाद व्यक्त केला.यावेळी बाल मेळावा टीम संदिप घोरपडे, भैय्यासाहेब मगर , वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे ,श्री.धर्माधिकारी सर, गिरीष दादा चौक, भाऊसाहेब देशमुख, ॲड.सारांश सोनार उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार भैय्यासाहेब मगर यांनी मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!