ज्युदो स्टेट चॅम्पियनशिपमध्ये पवन शिंपीची निर्णायक कामगिरी


अमळनेर : लातूर येथे नुकत्याच झालेल्या ज्युदो स्टेट चॅम्पियनशिप मध्ये अमळनेर येथील नगरसेवक प्रताप शिंपी यांचा मुुुलगा पवन शिंपी याने उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण करून ब्रांझ पदक पटकावले आहे. पवनला कल्पविजय स्पोर्ट्स क्लबचे सचिन वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. लातूर येथे झालेल्या स्टेट चॅम्पियनशिप मध्ये त्याची निवड झाली होती. या स्पर्धेत त्याने शेवटपर्यंत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना नामोहरण करीत यश संपादन केले. पवनने यापूूूूूर्वी कुस्ती व कराटे स्पर्धेत यश संपादन केले आहे. पवनने अमळनेर शहराचे नाव राज्यात गाजवले त्याबद्दल त्याचे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील, आमदार गुलाबराव पाटील,माजी आमदार साहेबराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, नगरसेवक संजय कौतिक पाटील, जीवन पवार, शिवसेनेचे नितीन निळे, मुन्ना शिंपी यांनी अभिनंदन केले आहे. त्याच्या या निर्णायक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!