
अमळनेर : येथील पाटील कॉलनी भागातील मूळचे ढेकू सिम चे रहिवासी श्रीमती प्रमिलाबाई भिला पाटील यांचे आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७२ वर्ष होते. अमळनेर कोर्टातील लिपिक श्याम भिला पाटील व पोलीस दलातील विनोद भिला पाटील यांच्या त्या मातोश्री होत. उद्या दिनांक २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता त्यांचे राहत्या घरून (पाटील कॉलनी) अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, दोन मुली, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो, हीच दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !