
अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील गुलाब हेमकांत देसले यांची धर्मपत्नी तथा खवशी गावच्या विद्यमान सरपंच सौ. नंदाताई गुलाब देसले यांचे आज दि.९ रोजी सायंकाळी दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्या ५३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, सासरे, सासू, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी हेमकांत पोपट देसले यांच्या त्या सूनबाई आहेत. अंत्ययात्रा उद्या सकाळी १० वाजता खवशी येथील राहत्या घरुन निघणार आहे. दशक्रिया विधी व उत्तरकार्य सोमवार दिनांक १८ मार्च रोजी आयोजिले आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !