अमळनेर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे राज्यपाल नियुक्त विधानसभा कोट्यातील रिक्त सिनेट सदस्यपदी आमदार अनिल भाईदास पाटील यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष भूषण भदाणे व अमळनेर शहराध्यक्ष सुनील शिंपी यांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे विधानसभा सदस्य कोट्यातील सिनेट सदस्य पद रिक्त असून हे पद राज्यपाल यांच्या अधिकाराने भरण्यात येते. या पदावर अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी वाचा फोडणारे अमळनेर विधानसभेचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची नियुक्ती करण्यात यावी असे म्हटले आहे.