अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर पारोळा येथे झाली वक्त्यांची कार्यशाळा


पारोळा : येथील शाळा नं.१ मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या १ ऑगस्टला येणाऱ्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर काल दिनांक २७ जुलै रोजी वक्त्यांची कार्यशाळा घेण्यात आली. विचार मंचावर युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, कार्यक्रमाचे उद्घाटक तालुका गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, मार्गदर्शक प्रा. डॉ. राहुल निकम, प्रा. डॉ. लिलाधर पाटील, समन्वयक बापूराव ठाकरे, दयाराम पाटील उपस्थित होते. सुरुवातीला अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर प्रा. अशोक पवार यांनी प्रास्ताविक केले. मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. राहुल निकम, यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयाराम पाटील यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!