युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेेर च्या वतीने व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल संजय सूर्यवंशी यांचा केला सत्कार

अमळनेर : येथील धनदाई महाविद्यालया च्या यशवंत सभागृहात मराठा सेवा संघ व युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे नुकतीच दिनांक २७ जुलै रोजी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर वक्त्यांची कार्यशाळा भरविण्यात आली. विचार मंचावर युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, कार्यक्रमाचे उद्घाटक व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, मार्गदर्शक प्रा. डॉ. राहुल निकम उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. अशोक पवार यांनी प्रास्ताविक केले. यानंतर युवा कल्याण प्रतिष्ठान च्या वतीने संजय सूर्यवंशी यांना व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. राहुल निकम यांनी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक असलेल्या अण्णाभाऊ साठे यांचा सविस्तर जीवनपट उलगडून सांगितला. एकंदरीत अण्णाभाऊ साठे यांचे विचार जनमानसात पोहचविण्याची गरज असल्याचेही सांगितले. प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनीही थोडक्यात मार्गदर्शन केले.
सत्काराला उत्तर देताना संजय सूर्यवंशी म्हणाले की, संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी पत्रकारिता क्षेत्रातील माझे योगदान लक्षात घेऊन माझी नियुक्ती व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष पदी केली. हा मला मिळालेला बहुमान आहे. आपण सर्व माझ्या परिवारातलेच असल्याने घरातल्या सत्काराने समाधान झाल्याचे सांगितले. यावेळी कु. किमया बोरसे, सौ. सुनिता मोरे, बापूराव ठाकरे, रामेश्वर भदाणे, अरुण देशमुख, प्रा. लिलाधर पाटील, विलास पाटील, दयाराम पाटील, अशोक पाटील, उमेश मनोरे, कु. रिया मनोरे, अशोक बिऱ्हाडे, देवदत्त संदानशिव, पेंढारकर सर, किशोर पाटील, अजिंक्य चिखलोदकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक बापूराव ठाकरे यांनी केले तर माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी आभार मानले.