
पारोळा : तालुक्यातील जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ संचलित किसान माध्यमिक विद्यालय, शेवगे बु. शाळेत शिक्षण सप्ताह चा सातवा दिवस समुदाय सहभाग दिवस असल्याने शेवगे गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आयोजित करण्यात आली. शिक्षण विषय जनजागृती विषयी बॅनर विद्यार्थ्यांच्या हाती दिसत होते. त्यात महिला सक्षमीकरण, शिकालं तर टिकाल अशी घोषवाक्ये असलेली पोस्टर्स देखील होती. प्रभात फेरी संपल्यानंतर, गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार मुख्याध्यापक संजय जाधव यांनी रोप देऊन केला.
अनिल उत्तमराव पाटील यांचेकडून लोकसहभागातून सर्व विद्यार्थ्यांना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली. वरण भात, बट्टी, वांग्याची भाजी व जिलेबी याचे चविष्ट भोजन देण्यात आले, तसेच पालक मेळावा घेण्यात येऊन विद्यार्थ्याची उपस्थिती, प्रगती इतर बाबीवर चर्चा घेण्यात आली असून महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत, वि. का. सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. शाळेत सप्ताहात विविध उपक्रम राबविल्याने गावातील ग्रामस्थ व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
