बँकेच्या वेबसाईटचे उद्घाटन व सभासद पाल्यांचा गौरव

अमळनेर : येथील इंदिरा भवनात काल दिनांक २८ जुलै रोजी अमळनेर को ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत सभासद पाल्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते उपस्थित गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी असंख्य सभासदांनी उपस्थिती दिली. सभेत सभासद विक्रांत पाटील , सोमचंद संदानशिव, प्रा डॉ लिलाधर पाटील, शशिकांत पाटील यांनी विविध सूचना मांडत संजय शुक्ल, दिलीप ठाकूर, गुलाब महाजन, भिका पाटील, पी. वाय. पाटील यांचेसह अनेक सभासदांनी बँकेच्या शतक महोत्सवानिमित्त विविध मागण्यांचे शेकडो सभासदांच्या सह्यांचे निवेदन दिले. यावेळी संचालक मंडळाच्यावतीने बोलतांना व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांनी शतक महोत्सवी वर्षात विविध उपक्रम राबवायचे दृष्टीने सभासदांनी केलेल्या मागण्या संचालक मंडळाने स्विकारून सदर सभा मंजूर करीत असल्याचे जाहीर केले. सभेचे प्रास्ताविक चेअरमन पंकज मुंदडे यांनी केले. बँकेच्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा संचालक विजय बोरसे यांनी मांडला. सभेचे व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक अमृत पाटील यांनी केले.
भव्य स्क्रीनवर बँकेच्या वेबसाईटचे झाले उद्घाटन…

दि अमळनेर को. ऑपरेटिव्ह अर्बन बँक शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करतांना बँक सभासदाभिमुख व्हावी या उद्देशाने सभेत चेअरमन पंकज मुंदडे, व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांचे हस्ते भव्य स्क्रीनवर बँकेच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संचालक मोहन सातपुते, प्रदीप अग्रवाल, पंडित चौधरी, भरत ललवाणी, अभिषेक पाटील, प्रविण पाटील, दिपक साळी, लक्ष्मण महाजन, सौ.वसुंधरा लांडगे, प्रविण जैन, डॉ. मनिषा लाठी, ॲड. व्ही. आर. पाटील, विजय बोरसे, बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सभा समारंभाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे कर्मचारी, पिग्मी एजंट यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी उपस्थित सभासदांमध्ये माजी संचालिका मिराबाई निकम, रामदास शेलकर, ॲड. सुरेश सोनवणे, प्रसाद शर्मा, हिम्मत पाटील, शिवाजी खैरनार, जयंतीभाई कोचर, जे. डी. पाटील, ईश्वर पाटील, पुरुषोत्तम शेटे, अतुल चौधरी, विजय वाणी, प्रभाकर महाजन, डी. ए. धनगर, दिपक गांधी, लुल्ला, आदी सभासद उपस्थित होते.
