साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचे साहित्य केवळ मनोरंजन नव्हे तर समाज प्रबोधनाचा ध्यास होता : प्रा.अशोक पवार

जळगाव जिल्ह्यातील आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त २०१ व्याख्यानांचा एकमेव अभिनव उपक्रम; डफ वादक कलावंत लोटन पवार यांच्या हस्ते झाले उद्घाटन

अमळनेर : अण्णाभाऊंनी आपल्या गीतातून कष्टकऱ्यांना समाज कारण व राजकारणात सक्रिय येण्याची एक हाक दिली. समाज परिवर्तन आधारित तळमळ आणि विचारांची स्पष्टता त्यातून निर्माण झालेले साहित्य केवळ मनोरंजन नव्हे तर समाज प्रबोधनाचा ध्यास होता असे विचार युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी व्यक्त केले. येथील अण्णाभाऊ साठे चौकात २०१ व्याख्यानांच्या अभिनव उपक्रमाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत आज अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर या संस्थेने अमळनेेर तालुक्यात १०१, धरणगाव तालुक्यात ५०, पारोळा तालुक्यात ५० अशा एकूण २०१ व्याख्यानांच्या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन डफ वादक कलावंत लोटन सखाराम पवार यांच्या हस्ते येथील अण्णाभाऊ साठे चौकात आज दिनांक १ ऑगस्ट रोजी करण्यात आले. सुरुवातीला अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत एकाच दिवशी अमळनेर, पारोळा, धरणगाव तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये जाऊन २०१ वक्त्यांनी व्याख्याने देऊन अण्णाभाऊंचा जीवनपट सुमारे ५० हजार विद्यार्थ्यां समोर मांडला. जळगाव जिल्ह्यात हा ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात आला. अभियानापूर्वी तीनही तालुक्यात वक्त्यांची कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. यात मार्गदर्शक म्हणून चोपडा समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राहुल निकम, धनदाई महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. लिलाधर पाटील व शिवश्री रामेश्वर भदाणे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. अशोक पवार यांनी अण्णाभाऊ साठे व्यक्ति, व्यक्तिमत्व, कर्तृत्व या विषयावर तयार केलेले वाचन साहित्य सर्व वक्त्यांना देण्यात आले होते. या वक्त्यांमध्ये प्राथमिक, माध्यमिक शाळांचे शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी यांचा समावेश होता. प्रत्येक शाळेवर दुसऱ्या जवळच्या शाळेचे वक्ते शिक्षक पाठविण्यात आले या नियोजनात पारोळा गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, धरणगाव गटशिक्षणाधिकारी भावनाताई भोसले, अमळनेर गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचा आणि सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचा सक्रीय सहभाग दिसून आला. महाराष्ट्रातील २०१ व्याख्यानांचे नियोजन हा एकमेव अभिनव उपक्रम असल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली. उपक्रमासाठी सर्व वक्ते, कार्यकर्ते यांनी स्वखर्चाने सहकार्य केले.

धरणगाव तालुक्याचे संयोजक म्हणून डी. ए .पाटील तर पारोळा तालुक्याचे संयोजक म्हणून रामेश्वर भदाणे यांनी काम पाहिले. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे प्रमुख म्हणून शिवश्री बापूराव आनंदराव ठाकरे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी नारायण फकिरा गावंडे, हरिचंद्र शिवराम कढरे, सम्राट थोरात, कांतीलाल गरुड, डॉ. राजू हिरामण कांबळे, प्रकाश नाना गरुड, अनिल तुळशीराम गरुड, राहुल गरुड, संतोष बिऱ्हाडे (न.पा.), प्रा. डॉ. विजय गाढे, समाधान मैराळे, संभाजी देवरे, नूर खान, सुरेश कांबळे, उमाकांत ठाकूर, सोपान भवरे, योगेश पाने, प्रशांत शिरसाट, संदीप पाटील जवखेडा ॲड. कौस्तुभ पाटील, जितू कढरे, बाळा अवचित्ते, प्रवीण शिरसाट,अजिंक्य चिखलोदकर, भाविका वाल्हे आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!