सानेगुरुजी ग्रंथालय संघटनेच्या वतीने मंत्री ना.चंद्रकांत पाटलांना दिले मागण्यांचे निवेदन

अमळनेर : महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील अमळनेर येथे कार्यक्रमासाठी आले असता, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ शाळेत भेट दिली. यावेळी जळगाव जिल्हा ग्रंथालय संघटनेच्या वतीने चंद्रकांतदादा यांचा सत्कार करण्यात आला. सानेगुरुजी ग्रंथालय संघटनेच्या वतीने काही मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. निवेदनात शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदानात वाढ व्हावी, ग्रंथालय वर्ग बदल करणे, नवीन ग्रंथालयांना मान्यता देणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. यावेळी पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, सहचिटणीस सुमित कुलकर्णी, संचालक दिपक वाल्हे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह संजय पाटील, तालुका ग्रंथालय अध्यक्ष नरेंद्र महाजन, सहाय्यक ग्रंथपाल मधुकर बाळापुरे, रमेश सोनार व अमळनेर तालुक्यातील ग्रंथालय संघाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!