
अमळनेर : शहरात सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे आदर्श शैक्षणिक संकुल १९६५ पासून लोकमान्य शिक्षण मंडळाने विकसित केले व त्याचा वटवृक्ष झाला आहे. सर्वत्र इंग्रजी माध्यम संदर्भात आकर्षण असताना मराठी माध्यमातून शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयत्न लोकमान्य शिक्षण मंडळ करीत आहे. या संस्थेची आधुनिक संगणक तंत्रज्ञानासाठी पुढील वाटचाल आनंददायी असल्याचे गौरवोद्गार उच्च तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी काढले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. लोकमान्य शाळेत व्ही. मुरलीधरन राज्यसभा खासदार निधीतून साकारलेल्या संगणक कक्षाचे उद्घाटन करताना ते म्हणाले. यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू सोनवणे व राजेश पांडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक प्राध्यापक डी .डी. पाटील होते.
याप्रसंगी शहरातील डॉक्टर अनिल शिंदे, दिलीप रामू पाटील, निरज अग्रवाल, सौ. वाघ पलांडे मॅडम आदी उपस्थित होते. चिटणीस विवेकानंद भांडारकर यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचाली संदर्भात प्रास्ताविक केले. संचालक वसंत बापू पाटील, नवसारीकर सर, प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक महाजन यांनी तर आभार प्रदर्शन मोरे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला शहरातील शिक्षण प्रेमी व मान्यवरांची उपस्थिती होती.
