
चोपडा : तालुक्यातील गोरगावले खुर्द येथील रहिवासी तथा हल्ली विष्णापूर ता. चोपडा येथे स्थित असलेले प्रगतीशील शेतकरी हिरालाल भगवान पेंढारे व त्यांचा लहान भाऊ देविदास भगवान पेंढारे यांना आपल्या मुलांनी एकाच वेळी आनंद व्यक्त करण्याची वेळ आली. या दोन्ही भावांची मुले पहिल्याच प्रयत्नात सेट परीक्षा उत्तीर्ण झालेत हे विशेष.
हिरालाल भगवान पेंढारे यांचा मुलगा चि. गणेश हा कवयित्री बहिणाबाई चौधरी तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे एम.एस्सी. (रसायनशास्त्र) दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. शिक्षण घेत असतांना तो सेट परीक्षा उत्तीर्ण झाला. तर लहान भाऊ देविदास भगवान पेंढारे यांचा मुलगा भरत हा एम.ए. (अर्थशास्त्र) असून तो सुद्धा सेट परीक्षा उत्तीर्ण झाला. पहिल्याच प्रयत्नात दोघे भाऊ सेट परीक्षा उत्तीर्ण झालेत हे विशेष. दोन्ही भूमिपुत्रांनी हे उज्वल यश संपादित केल्यामुळे विविध स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे यशवंतांचे अभिनंदन !
