साने गुरुजी विद्यालयाचे प्रांगणात होणार नूतन इमारतीचे भूमीपूजन व जलकुंभाचे उद्घाटन

अमळनेर : येथील साने गुरुजी विद्यालय व अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिनांक २२ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२४ या काळात साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. गुरुवार, दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता साने गुरुजी विद्यालय प्रांगणामध्ये नूतन इमारत भूमीपूजन व अतिरिक्त जल कुंभाचे उद्घाटन होणार आहे. भूमीपूजन कार्यक्रम अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर जलकुंभाचे उद्घाटन ग.स सोसायटीचे अध्यक्ष उदय मधुकर पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी धरणगावचे सामाजिक कार्यकर्ता प्रा. रमेश नथू महाजन असून प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ता दामोदर वाढवे यांची उपस्थिती असेल.
वकृत्व स्पर्धेचे उद्घाटन, बक्षीस वितरण व पुरस्कार प्रदान…
शुक्रवार, दिनांक २३ ऑगस्ट सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर अमळनेर येथे वकृत्व स्पर्धेचे नियोजन समितीचे पदाधिकारी वकृत्व स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत. शनिवार, दिनांक २४ ऑगस्ट दुपारी तीन वाजता नाट्य सभागृहात बक्षीस वितरण व पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला आहे.
साथी गुलाबराव पाटील सामाजिक पुरस्कार यावर्षीचे प्रथम वर्ष पुरस्काराचे मानकरी म्हणून राजेंद्र छात्रालय धुळे चे प्राचार्य मधुकर भोजू शिरसाठ यांना पद्मश्री कांतीभाई शहा संस्थापक युवक बिरादरी मुंबई यांच्या शुभहस्ते दिला जाणार आहे.
तर साथी गुलाबराव पाटील राजकीय पुरोगामी पुरस्कार प्राध्यापक सुधीर गौतमारे, खुर्सापुर जि. नागपूर यांना मा.आमदार कपिल पाटील संस्थापक शिक्षक भारती मुंबई यांच्या शुभहस्ते दिला जाणार आहे.
कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्राला नवीन दिशा देणारी मनोगते असतील. वैचारिक मेजवानीतील संवाद ऐकण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सहसचिव ॲड. अशोक बाविस्कर, सदस्य अमृत पाटील, डॉ. यशवंतराव देशमुख, डॉ. शेख शकील जलोद्दीन, भास्कर बोरसे, मगन पाटील, किरण पाटील, युवराज सोनवणे, मुख्याध्यापक संजीव पाटील, सुनील पाटील, श्रीमती अनिता बोरसे, सौ वैशाली चव्हाण, शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
