
अमळनेर : प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, RUSA यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यार्थ्यांसाठी ताण व्यवस्थापन तंत्र : योग’ या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समारंभासाठी विद्यापीठाचे योग विभाग प्रमुख डॉ. राजेश इच्छाराम पाटील (सहायक अभियंता) उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन होते. प्रमुख वक्ता म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योग विभागाच्या प्रा. डॉ. लिना मनिष चौधरी उपस्थित होत्या. वरिष्ठ जिमखाना विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. संदीप नेरकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस. एम. राजपूत यांनी अतिथींचा परिचय करुन दिला.
प्रा. डॉ. लिना मनिष चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना अतिशय शास्त्रशुद्ध आणि मौलिक स्वरूपाचे मार्गदर्शन केले. यावेळी तारुण्यातले अर्थात युवा अवस्थेतील खूप प्रश्नांची उत्तरे त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. यावेळी उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, डॉ. योगेश तोरवणे यांच्यासह जिमखाना विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. संदीप नेरकर (सिनेट सदस्य ), डॉ. मुकेश भोळे (IQAC समन्वयक), प्रा. वृषाली वाकडे, डॉ. एस. डी. बागुल, डॉ. एस. एम. राजपूत, डॉ. संतोष दिपके, डॉ. हेमंत पवार, डॉ. प्रियंका पाटील, प्रा. अर्चना पाटील, प्रशांत भाऊ देवकाते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रियांका पाटील यांनी केले तर क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील यांनी आभार मानले.
