बदलत्या काळात महिलांनी स्वतः व मुलींच्या सुरक्षेबाबत जागरुक असणे गरजेचे : माजी जि. प. सदस्या जयश्री पाटील

अमळनेर : सरकार लाडक्या बहिणींचा विचार करत असले तरी भाऊ या नात्याने आधार संस्थेच्या माध्यमातून अशोक पाटील हे राबवत असलेला उपक्रम महिलांचा गौरव आणि सन्मान वाढवणारा आहे. बदलत्या काळात महिलांनी स्वतः व मुलींच्या सुरक्षेबाबत जागरुक असणे गरजेचे आहे असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांनी केले. आधार फाउंडेशनच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी चौबारी येथील स्व. दे. ना. पाटील माध्यमिक विद्यालयात हा रक्षाबंधन व स्नेह मेळावा नुकताच आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना जयश्री पाटील म्हणाल्या.
आधार फाउंडेशनच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्यातर्फे मुडी- मांडळ जिल्हा परिषद गटातील बचत गटांसाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या ११०० कार्यकर्त्या महिलांना रक्षाबंधन निमित्त पैठणी साडीभेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजक कृ. उ. बा. समिती सभापती अशोक आधार पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी झटणाऱ्या बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव तसेच कार्यकर्त्या भगिनींच्या परिश्रमाची भाऊ या नात्याने दखल घेऊन माझ्या बहिणींना समारंभपूर्वक पैठणी भेट देऊन गौरविणे माझे नैतिक कर्तव्य समजतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना, ‘आधार संस्था व श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मुडी-मांडळ जि. प. गटात सुरू असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती अमळनेर अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन रणजित शिंदे यांनी दिली. शेतकरी नेते डॉ. रामराव पाटील यांनी मुडी मांडळ जि. प. गटातील नागरिकांनी समाजोपयोगी कामाची दखल घ्यावी असे आवाहन केले. अमळनेर तालुका बचत गटाच्या तालुका व्यवस्थापक श्रीमती सीमा रगडे यांनी बचत गटासाठी राबणाऱ्या महिलांची कुणीतरी दखल घेत असल्याने समाधान व्यक्त केले.
यावेळी मंचावर बचत गटाच्या सी.आर.पी भगिनींनी अशोक पाटील यांचे औक्षण करुन राखी बांधली. तर अशोक पाटील, सौ योगिता पाटील यांच्या वतीने जि. प.सदस्या सौ.जयश्री पाटील यांचेहस्ते उपस्थित भगिनींना पैठणी साडी भेट देण्यात आली. तसेच स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंदाकिनी भामरे, आशाबाई चावरिया, सामाजिक कार्यकर्ते जोत्सना लोहार, अलका पाटील, भारती पाटील यांनीही अशोक पाटील यांचे औक्षण करुन राखी बांधली.
यावेळी श्री.आधार पाटील, सौ विमलबाई पाटील यांचा सत्कार सौ. जयश्री पाटील यांनी केला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान धनगर, सौ. पुष्पा पाटील, भाईदास भिल, प्रकाश अमृतकर, ऋषभ पारेख, शरद पाटील, विजय जैन, माजी संचालक सदाबापू पाटील, गट सचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, बचत गटाच्या समन्वयक सौ. ज्योती भावसार, सरपंच कैलास पाटील, श्याम पाटील, संजयराव पाटील, किसन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा पदाधिकारी राहुल गोत्राळ आदींसह मुडी मंडळ जि. प. गटातील विविध संस्थांचे पदाधिकारी राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चौबारी हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रशेखर व्यास, मुख्याध्यापक आशिष पवार, संस्थेचे कार्याध्यक्ष समाधान शेलार, समाधान पाटील, समाधान शिंदे ,योगेश पाटील, शिक्षक शिक्षिका वृंद यांनी परिश्रम घेतले. बचत गटातील हजारो महिला, भगिनी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.