प्रताप महाविद्यालयात मेजर ध्यानचंद जयंती चे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिनी विविध स्पर्धा संपन्न

अमळनेर : येथील खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय व रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद यांच्या जयंती चे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिनी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रताप महाविद्यालयाच्या ईनडोर व क्रीडांगणावर दि.२९ ऑगस्ट २०२४ रोजी विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. यात, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेबल टेनिस अश्या विविध खेळ प्रकारात जवळपास दोनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.

स्पर्धा उदघाटन प्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्षा सौ. माधुरी पाटील, विश्वस्त सौ. वसुंधरा लांडगे, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, रोटरी प्रेसिडेंट ताहा बुकवाला, सेक्रेटरी विशाल शर्मा, जेष्ठ संचालक हरी भिका वाणी, संचालक योगेश मधुसूदन मुंदडा, डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, खा.शि. मंडळाचे सचिव व प्राचार्य डॉ. अरुण बी जैन, प्रताप तत्वज्ञान केंद्र प्रमुख डॉ. दिलीप भावसार, उप प्राचार्य डॉ. विजय तुंटे, डॉ. योगेश तोरवणे, जिमखाना समन्वयक व सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. मुकेश भोळे, क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील, प्रा. अमृत अग्रवाल, कुलसचिव राकेश निळे, प्रा. अर्चना पाटील, प्रशांत देवकाते, संदीप सराफ, मिलिंद शिंदे, गुणवंत पाटील, दिपक चौगुले व सर्व खेळाडू, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विदयार्थी उपस्थित होते. यावेळी बहुविध खेळांचे सादरीकरणाद्वारे मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमृत अग्रवाल यांनी केले तर प्रस्तावना जिमखाना विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. एस. बी. नेरकर यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!