महिलांच्या लैंगिक छळ व रॅगिंग विरोधी कायदा बाबत प्रताप महाविद्यालयात मार्गदर्शन

अमळनेर तालुका विधी सेवा समिती व वकील संघाचा सहभाग महत्त्वपूर्ण

अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग अँड सेक्युलर हरेसमेंट समिती व तालुका विधी सेवा समिती अमळनेर, वकील संघ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या लैंगिक छळ व रॅगिंग विरोधी कायदा बाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रताप महाविद्यालयातील पूज्य सानेगुरुजी सभागृहात दिनांक २९ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खानदेश शिक्षण मंडळाचे सचिव व तथा प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन होते. विचार मंचावर ॲड. अविनाश व्ही. खैरनार, ॲड. किशोर डी. पाटील, खानदेश शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा माधुरीताई पाटील, सुनिल पाटील (वरिष्ठ सहाय्यक, तालुका विधी सेवा समिती, अमळनेर), संस्थेचे सह सचिव डॉ. धिरज वैष्णव आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी ॲड. राजेंद्र व्ही. निकम ( सदस्य, वकील संघ अमळनेर) यांनी पोक्सो ऍक्ट अर्थात, बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम या विषयी विस्तृत अशी माहिती दिली. ॲड. यज्ञेश्वर पी. पाटील (सदस्य, वकील संघ,अमळनेर) यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ कायद्याविषयी माहिती विशद केली. ॲड. जगदीश यु. बडगुजर (सदस्य, वकील संघ अमळनेर) यांनी रॅगिंग विरोधी कायदा व वाहतुकीचे नियम बद्दल सखोल माहिती दिली.
समितीच्या सदस्या डॉ. वंदना भामरे, डॉ. प्रियंका पाटील, श्रीमती एस. व्ही. महाले, विद्यार्थिनी प्रतिनिधी अंकिता सावंत, प्रा. पुष्पा पाटील, प्रा. भाग्यश्री जाधव, प्रा. वृषाली महाजन, प्रा. हेमलता सूर्यवंशी, प्रा.मनीषा मोरे, प्रा. सुचित्रा रत्नपारखी, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थिनी यांच्या सह सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे समन्वयक प्रा. डॉ. कल्पना पाटील यांनी केले तर आभार समितीच्या सदस्य तथा गणित विभाग प्रमुख डॉ. नलिनी पाटील यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!