टाकरखेडे येथे ‘मदतीचा हाथ.. एकनाथ’ या उपक्रम अंतर्गत बांधकाम कामगारांना मोफत भांडी वाटप

अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडे येथे ‘मदतीचा हाथ.. एकनाथ’ या उपक्रम अंतर्गत बांधकाम कामगारांना मोफत भांडे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. अमळनेर शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांच्या संकल्पनेतून जिजाऊ आय.टी.आय टाकरखेडे येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांनी तालुक्यात राबवत असलेल्या योजना तसेच राज्य व केंद्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण, बचत गट आदी योजनांबाबत माहिती दिली. बांधकाम कामगारांसाठी ज्या योजना आहेत अशा योजनांबाबतही माहिती दिली.

यावेळी जिजाऊ संस्थेच्या चेअरमन सुरेखा मधुकर पवार, टाकरखेडे चे सरपंच रामभाऊ, ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश धोंडू पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील, दूध डेअरी चेअरमन लक्ष्मण बाबुराव पाटील, वि.का.सो चेअरमन सुभाष आधार पाटील , ग्रामसेवक अविनाश पाटील, प्रभाकर पाटील, पुरुषोत्तम पाटील, कंडारी खुर्द चे सरपंच सत्तर रामभाऊ पवार, ग्रा. पं. सदस्य आशाबाई रामकृष्ण पवार, मच्छिंद्र टेलर आदी उपस्थित होते. मेळावा यशस्वीतेसाठी शिवसैनिक बापूजी पाटील, अक्षय पाटील, किरण पाटील, करण पाटील, सोनू पाटील, भूषण पाटील, बुधा पाटील यांनी परिश्रम घेतले. मेळाव्याला कंडारी, लोणे, नगाव, पातोंडा, निमझरी, औरंगपुर, दहिवद येथील नागरिक उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!