लोंढवे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने स्पर्धा परिक्षेत यश संपादन करुन निवड झालेल्या युवकांचा सत्कार


अमळनेर : तालुक्यातील लोंढवे येथील चार युवक MPSC स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांची जिल्हा परिषद जळगांव अंतर्गत अमळनेर पंचायत समिती व आरोग्य विभागात नियुक्ती झाली आहे. यातील, अक्षय रमेश पाटील, प्रभाकर उदा खैरनार यांची सहाय्यक अभियंता म्हणून जिल्हा परिषद जळगांव अंतर्गत अमळनेर पंचायत समिती येथे नेमणूक झाली आहे. तसेच प्रविण शांताराम पाटील, आकाश पांडूरंग भागवत यांची आरोग्य विभागात निवड झाली आहे. याशिवाय तीन युवकांची सैन्य दलात अग्नीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. यात, कुंदन बाळू पाटील, दिनेश भगवान पाटील, मनोज राजेंद्र पाटील यांची निवड झाली. यामुळे गावात आनंद पसरला. लोंढवे गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या युवकांचे कौतुक व्हावे म्हणून ग्रामपंचायत लोंढवे यांच्या वतीने नुकतेच सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच भारती पाटील होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्त केंद्रप्रमुख बन्सीलाल भागवत यांनी केले. पंचायत समिती अमळनेरचे माजी उपसभापती बाळासाहेब पाटील यांचे हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बन्सीलाल भागवत बाळासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, उपसरपंच चतुर पाटील, ग्राम पंचायत सदस्या अचलबाई भागवत, मोनाली पाटील, दिलीप पाटील, ज्ञानेश्वर पवार, मालुबाई पाटील, मिनाबाई पाटील, मालती खैरनार, नारायण पवार, निळकंठ पाटील, निवृत मुख्याध्यापक देविदास माळी, ग्रामसेवक मुरलीधर पवार, अर्जून भागवत, दिपक पाटील, रमेश पाटील ग्रामसेवक सर्व ग्रामस्थ, ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!