
अमळनेर : मौलाना अब्दुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्जोद, ता.रावेर यांच्यातर्फे अमळनेेर येथील रहिवासी व हातेड येथील आरोग्यसेविका सुवर्ण कौतिक धनगर यांना रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते नुकताच आदर्श आरोग्य सेविका पुरस्कार देण्यात आला. सौ. सुवर्णा कौतिक धनगर करणखेडा हायस्कूलचे माध्यमिक शिक्षक आनंदा बापू धनगर यांच्या धर्मपत्नी आहेत.
यापूर्वी मारवड येथे कार्यरत असताना सुवर्णा धनगर यांनी दोन जुळ्या बाळांची प्रसूती यशस्वीरित्या केली होती. कोरोना काळात आपले कुटुंब एवढाच आपला परिवार न मानता संपूर्ण समाज आपला परिवार मानला आणि कार्य करत राहिल्या. कोरोना काळातील त्यांचे उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांना अनेक संस्थांनी कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले. किशोरवयीन मुलींचे हिमोग्लोबिन टेस्ट करणे त्यांना उपचार देणे, ग्रामीण भागातील मुला मुलींना आहाराविषयी स्वच्छतेविषयी महत्त्व पटवून देणे, गरोदर मातांना परिपूर्ण सेवा देणे, शेत शिवारात लसीकरण करणे, आदिवासी भागातील पालकांना लसीकरणाचे योग्य असे मार्गदर्शन करून लसीकरण संदर्भात लसीचे महत्त्व पटवून देणे, पंतप्रधान मातृत्व वंदना योजना बाबत मातांचे समुपदेशन करणे, अंगणवाडी तील मुलांना आर्यन सायरप देणे, जंतनाशक गोळ्या देणे, शाळेतील मुलांना डीपीटी बूस्टर डीटी लसीकरण करणे, पल्स पोलिओ मोहीम आदिवासी भागातील ग्रामीण मुलांना राबवून पल्स पोलिओ चे डोस देणे, कुष्ठरोग रुग्णांची तपासणी करणे व त्यांच्यावर उपचार करणे, तसेच क्षयरोग रुग्णांची तपासणी करणे व त्यांच्यावर उपचार करणे, बेटी बचाव बेटी पढाव मोहिमेची जनजागृती करणे. ग्रामसभा,गटसभा द्वारे आरोग्य शिक्षणाचा प्रसार करणे व जनजागृती करणे, अतिजोखमीच्या मातेला घरी जाऊन सेवा देणे या आणि अशा अनेक प्रकारच्या आरोग्यसेवा त्या आदिवासी भागातील माता पालकांना मुला मुलींना देत आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!
