स्वरांजली म्युझिकल गृप तर्फे जी. एस. हायस्कूलच्या आयएमए हाॅल येथे सदाबहार गितांचा कार्यक्रम रंगला

स्वर सम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांचा वाढदिवस व स्व. महेंद्र कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली

अमळनेर : येथील स्वरांजली म्युझिकल गृप तर्फे स्वर सम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांचा वाढदिवस व स्व. महेंद्र कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल सोमवार, दि. ३० सप्टेंबर रोजी जी. एस. हायस्कूलच्या आयएमए हाॅल येथे हिंदी – मराठी फिल्मी सदाबहार गितांचा विनामूल्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संगीत प्रेमींसह दर्दी रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घेतला.
माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, खानदेश शिक्षण मंडळाचे हरी भिका वाणी, जी. एस. हायस्कूल चे मुख्याध्यापक बी. एस. पाटील, विद्या हजारे, माधुरीताई पाटील, व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष उमेश काटे, पत्रकार उमेश धनराळे, मिलींद पाटील यांनी नटराज पूजन व माल्यार्पण केले. दरम्यानच्या काळात ॲड. ललिता पाटील यादेखील कार्यक्रमास हजर होत्या.

प्रास्ताविक करताना सौ. वसुंधरा लांडगे म्हणाल्या की, यापूर्वी आपण महाभारत ऐकताना ‘यदा यदा ही धर्मस्य.. ‘ पहिला जो श्लोक होता. भगवतगीतेतील तो श्लोक ऐकत असताना आपलं मन प्रसन्न होत असे. यातून कसं जगायला शिकावं हे कळलं. तसं आपणही शिकलो. कलाकार किशोर देशपांडे यांनी तो श्लोक कॅसिओ वर सादर केला. कार्यक्रमाचे सुरुवातीला ‘वक्रतुंड महाकाय.. सूर्य कोटी समप्रभ..’ गणेश श्लोक महाजन सरांनी म्हटला. यानंतर गाण्याची मैफल रंगली. यात महेंद्र कपूर यांना श्रद्धांजली पर पहिलं गाणं ‘तुम अगर साथ देने का वांदा करो..’ देविदास बिरारी यांनी गायले. गायक कलाकार म्हणून मिलींद पाटील, देविदास बिरारी, रविंद्र माळी, पूनम अग्रवाल, नेहा देशपांडे, विद्या पाटील, युगछाया शिंगाडे यांनी सहभाग घेतला.

यानंतर लतादीदींसह अन्य गायकांचीही गाणी रंगली. यात, पिया याद रखोगे के भूल जाओगे.., मेरे घर आयी एक नन्ही परी.., आजकल मैं पिघल गया.., सूनो सजना…, सूर तेची छेडीता.., परवत के उस पार.., हम तो तेरे आशिक है.., तेरे संग प्यार मैं नहीं तोडना.., ज्योत से ज्योत जगाते चलो.., बच्चे मन के सच्चे.., नहीं मैं नहीं देख सकता तुझे रोते.., तू कितनी अच्छी है.., जिस दिले.. एक तू बता दे.., जिंदगी की ना तुटे लडी.., सावन का महिना पवन करे शोर.., चल संन्यासी मंदीर में… आदी गीतांनी कार्यक्रम रंगला.
यावेळी अनेक शिक्षक, शहरवासीय कार्यक्रमास हजर होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. वसुंधरा लांडगे यांनी केले. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, महेश पाटील, विद्या हजारे, माधुरी पाटील, किरण भाई, हरी आण्णा, योजना जितेंद्र शिंदे यांनी कलाकारांना रोख बक्षिसे जाहीर केली. कार्यक्रमास संगीतसाथ केतन जोशी, देवांशु गुरव, किशोर देशपांडे, शुक्ल, गंगाधर कढरे, नितीन महाजन, रविंद्र माळी या कलाकारांनी दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वरांजली ग्रुपच्या टीमने परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!