नाशिक ते कळंबू एसटी प्रवास करीत असताना बाजूला बसलेल्या दोन ताई माहेरच्या गप्पा करीत होत्या. दोन ताईंच्या माहेरच्या गप्पा ऐकून मनात विचारांचे काहूर माजले. त्यांच्या ओठावरचं मनात आलं.. मनाने बोटाला सांगितलं.. बोटांनी कागदावर आणलं… आणि ‘माहेर’ नावाची कविता साकारली. लिहिणारा कवी फक्त निमित्त होता असं सांगत आमचे मित्र अहिराणी कवी राजेंद्र उत्तम पाटील यांनी अनुभव कथन केले. तीच ही कविता…
… ‘माहेर’ …
वं शेजी बाई !.. कसं सांगू तुले,
माहेर मन्ह जसं, कयस मंदिरले ।
कसं सांगू..? मन्हा माहेरन नांव,
जठे तपेत वाहे, चाले तिन्हाम्हा नांव ।।
माय मन्हा माहेरम्हा.. काय कमी पडे,
भाऊ मन्हा बाजीराव, करे खेतीम्हा धडपड ।
काय सांगू तुले.. मन्हा माहेरनी कथा,
वावरेस्माईन निघती वं, गाडा नी गाडा भोता ।।
काय सांगू तुले.. मन्हा माहेरनी वट,
बाप मन्हा जसा, सावकार शेटं ।
काय सांगू तुले.. मन्हा माहेरना वाटे,
भोया महादेव नं मंदिर, तापी – पांझरा ना काठे ।।
जतरा भरे तठे,.. दर शिवराती ले,
दोन्ही हात जोडी सांगस, सुखी ठेव मन्हा माहेरले ।
कशी सांगू तुले.. मन्हा माहेरनी माया,
माय मन्ही जशी वं, आंबा झोपाया ।।
कसं सांगू तुले.. मन्हा माहेरनां लोके वं,
बालाजीना रथ ना, जसा दोन्ही चाके ।
कसं सांगू तुले.. मन्ह माहेरनं पाणी,
तुंबड्या चौधरी लाये, जशी ऊस नी घाणी ।।
काय सांगू तुले.. मन्हा माहेरनी कथा,
समजाव नही तुले, देखा बिगर सोता ।।