रोटरी क्लब ऑफ अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

एच.आय. व्ही.सह जगणाऱ्या बालकांची दिवाळी केली गोड


अमळनेर : येथील रोटरी क्लब आणि आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एच. आय. व्ही.सह जगणाऱ्या बालकांना सकस आहार किराणा किट, प्रोटीन किट व दिवाळी फराळाचे वाटप नुकतेच रोटरी हॉल येथील कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनिलभाई शहा होते. प्रमुख पाहुणे म्हणून संग्राम संस्था सांगली येथील किरण व प्रेरणा संस्था यवतमाळ येथील माधुरीताई यांची उपस्थिती होती. किरण या स्वतः एचआयव्ही सह तीस वर्ष जीवन जगत आहेत. त्यांनी एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींनी जगण्याची हिंमत कशी निर्माण करावी ? यावर मार्गदर्शन केले.

या उपक्रमासाठी शहरातील काही दात्यानी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर २२ हजार ५०० रुपयांचा किराणा माल देऊन आपले योगदान दिले. अमळनेर शहरातील स्वादिष्ट नमकीनचे मालक निलेश पाटील व त्यांचे सहकारी पप्पू पाटील यांनी फराळ, तसेच रोटेरियन अनिल भाई शहा, रंजन शहा यांच्याकडून प्रोटीन किट देण्यात आले. या प्रसंगी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील यांनी केले. यावेळी आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक रेणू प्रसाद, रोटरी क्लबचे अध्यक्ष ताहा बुकवाला, विवेक देशमुख, किर्तीकुमार कोठारी, प्रतिक जैन, अभिजीत भांडारकर, राजेंद्र जैन, देवांग शहा, रोनक संकलेचा, प्राचार्य डॉ. दिलीप भावसार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आधार बहुउद्देशीय संस्थेचे राकेश महाजन, मुरलीधर बिरारी, पुनम पाटील, दीप्ती शिरसाठ, दीपक विश्वेश्वर, तौसिफ शेख यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अश्विनी सूर्यवंशी यांनी केले तर संजय कापडे यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!