जोरदार शक्तिप्रदर्शन करत काल दि. २८ ऑक्टोबर रोजी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

अमळनेर : माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शक्तिप्रदर्शन करत काल दिनांक २८ ऑक्टोबर रोजी अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्याकडे दाखल केला. सकाळी १० वाजेच्या सुमारास वाडी चौकात विठ्ठल रखुमाई चे दर्शन घेऊन संत सखाराम महाराजांना अभिवादन करण्यात आले. तेथूनच खुल्या जीप वर शिरीष चौधरी, त्यांची पत्नी सौ. अनिता चौधरी, बंधू रविंद्र चौधरी, बहीण रेखाताई चौधरी विराजमान होऊन डीजे च्या निनादात रॅली काढण्यात आली. यावेळी घोषणाबाजी करत वाडी चौकातून रॅलीला सुरुवात झाली.
वाडी चौक – सराफ बाजार -दगडी दरवाजा -तिरंगा चौक -पाचपावली देवी चौक -बस स्टॅन्ड -महाराणा प्रताप चौक या मार्गाने रॅली तहसील कार्यालयाबाहेर आली. तत्पूर्वी सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. तहसील कार्यालयाबाहेर रॅली आल्यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी रविंद्र चौधरी, गुलाब पाटील, शिरीष चौधरी यांची भाषणे झाली. अमळनेर मतदार संघाचा विकास आणि बळीराजाला न्याय देण्यासाठी शिरीष चौधरी यांना विजयी करावे असे आवाहन भाषणातून करण्यात आले. प्रविण पाठक यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष नाना रतन चौधरी, माजी उपनगराध्यक्ष मोहन सातपुते, अनिल महाजन, पंकज चौधरी, किरण गोसावी, किशोर पाटील, सलीम टोपी, मनोज शिंगाणे, राहुल कंजर, श्रीराम चौधरी, संजय चौधरी, प्रा. ई. टी. चौधरी, सुनील भामरे, अविनाश जाधव, नरेश कांबळे, नितेश लोहरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
