साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती निमित्त प्रा.श्याम पवार यांनी स्मारकाला दिली एक लाख रुपये देणगी

साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती निमित्त प्रा.श्याम पवार यांनी स्मारकाला एक लाख रुपये देणगीचा दिलेला धनादेश स्विकारताना प्राचार्य डॉ. अरविंद सराफ , कार्याध्यक्ष चेतन सोनार, सचिव दर्शना पवार, गोपाळ नेवे सोबत शुभम पवार.

अमळनेर : साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त, खान्देशात प्रबोधनपर १२५ उपक्रम व साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या वतीने स्ट्रक्चरल हॉल उभारणीचा निर्धार करण्यात आला आहे. त्या दिशेने वाटचाल सुरु आहे. साने गुरुजींचा मानवतेचा व समतेचा विचार जनमानसात रुजावा, वाढावा यासाठी या निर्धारात लहान मोठ्या साने गुरुजी प्रेमींचा कृतीशील सहभाग वाढताना दिसत आहे.

प्रा. श्याम पवार यांनी साने गुरुजी स्मारकासाठी दिली एक लाख रुपयांची देणगी

साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी प्रा. श्याम पवार आहेत. त्यांच्या दातृत्वाचा अनूभव नेहमी स्मारकाला आहे. त्यांना मनापासून वाटते की, साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान चे कामाला गती यावी. अनेक पिढ्यांचा गुणात्मक विकास त्यातून व्हावा. भौतिक विकासा बरोबर गुणात्मक विकास ही महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेले सर्वसामान्य माणसाच्या श्रमातून निर्माण होणारे हे पहिले स्मारक असेल.

लोकसहभागातून १३ एकर खडकाळ जागा खरेदी करून सात हजार झाडांचे संगोपन येथे झाले आहे. आई आपल्या लेकराला सांभाळते तसे या झाडांचे संगोपन सुरु आहे. तेथील जैवविविधता टिकविणे, पाणी जिरवणे याबरोबरच विहीर, वीज, बोरवेल अशी कामे पुर्णत्वास नेण्याचे काम सुरु आहे. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान चा हा संकल्प आहे. खानदेशातील तरुण, शेतकरी, महिला यांच्या क्षमता विकासासाठी प्रशिक्षण केंद्र उभारणीचा गेल्या अनेक वर्षापासून साने गुरुजी कर्मभूमी स्मारक तरुणांची युवा श्रमसंस्कार छावणी आयोजित करते. खान्देशातील ३०० च्या आसपास मुले दरवर्षी त्यात सहभागी होतात. प्रशिक्षण केंद्र उभारल्यानंतर वर्षातून तीन वेळा अशी बौद्धिक श्रमसंस्कार छावणी घेतली जाईल. विविध गाव शाळा, कॉलेज मध्ये जाऊन प्रबोधन पर उपक्रम सुरु आहेत. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, प्रेम, सहकार्यातून हे काम पुढे जाणार आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!