निवडणूक जनरल निरीक्षक सिंह साहेब यांची उपस्थिती

अमळनेर : येथील टाकरखेडा रोडवरील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम क्रमांक ६ येथे आज रविवार, दि १७ नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक आयोगातर्फे सर्व बीएलओ, सेक्टर ऑफिसर यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत बीएलओ यांना मतदान केंद्राविषयी आवश्यक मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाची आकडेवारी भरण्याबाबतचे ॲप (लिंक) याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मतदार स्लीप वाटपाबाबत अहवाल सर्व बीएलओ यांच्याकडून घेण्यात आला. या बैठकीला निवडणूक जनरल निरीक्षक सिंह साहेब, निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, बीडीओ ओमप्रकाश रामावत, नायब तहसीलदार प्रशांत धमके तसेच सर्व निवडणूक विभाग कर्मचारी यांचेसह बीएलओ मोठ्या संख्येने उपस्थित होते.