मतदारांमध्ये जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जी.एस.हायस्कूल ची जनजागृती रॅली

अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी. एस. हायस्कूल तर्फे सोमवार, दिनांक १८ रोजी मतदान जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले. अमळनेर विधानसभा मतदारसंघात स्वीप उपक्रमअंतर्गत मतदारांमध्ये जनजागृती व्हावी तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान व मतदारांसाठी असलेले घोषणा फलक हातात घेतले होते.
यावेळी मुख्याध्यापक बी. एस. पाटील, उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे, पर्यवेक्षक एस. आर. शिंगाणे, सी. एस. सोनजे, शिक्षक प्रतिनिधी एस. पी. वाघ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!