
अमळनेर : येथील शिवशाही फाऊंडेशन व सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच यांचेतर्फे ९ नोव्हेंबर पासून तीन दिवसीय “प्रेरणादिप व्याख्यानमाला” चे आयोजन केले आहे. जी.एस.हायस्कूल मधील आयएमए हॉलमध्ये दररोज सायंकाळी ६ वाजता व्याख्यानास सुरुवात होणार आहे. शैक्षणिक व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष आहे.
व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी शनिवारी (९ नोव्हेंबर) रोजी आयकर उपायुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण (मुंबई) यांचे “सामाजिक उपक्रमातून व्यक्तिमत्त्व विकास” या विषयावर व्याख्यान होणार आहे. माजी आमदार साहेबराव पाटील अध्यक्षस्थानी राहतील. नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील तसेच ग. स. सोसायटीचे उपाध्यक्ष शामकांत भदाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. रविवारी (ता.१०) रोजी दर्जी फाउंडेशनचे संस्थापक प्रा. गोपाल दर्जी (जळगांव) यांचे “स्पर्धा परीक्षा व युवकांपुढील आव्हाने” या विषयावर व्याख्यान होणार आहे. नवनिर्वाचित आमदार अनिल भाईदास पाटील अध्यक्षस्थानी राहतील. जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील तसेच ग. स. सोसायटीच्या संचालिका विद्यादेवी कदम प्रमुख पाहुणे राहतील. सोमवारी (ता.११) रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील (धुळे) यांचे “मंतरलेली अंधश्रद्धा” या विषयावर व्याख्यान होणार आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ अध्यक्षस्थानी राहतील. विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ व जी. एस. हायस्कूलचे चेअरमन योगेश मुंदडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. व्याख्यानमालेेेेेेस उपस्थित राहण्याचेे आवाहन आयोजकांनी केेेलेे आहे.