
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या करियर कौन्सिलिंग सेंटरचा विद्यार्थी रविंद्र सुदाम पाटील यांनी २०२३ मध्ये मुंबई जिल्हा न्यायालयात शिपाई पदासाठी स्पर्धा परीक्षा दिली होती. या परीक्षेचा अंतिम सुधारित निकाल १२ जानेवारी २०२५ रोजी जाहीर झाला. त्यामध्ये रविंद्र सुदाम पाटील (यादी क्रमांक १०) याची मुंबई जिल्हा न्यायालयात शिपाई या पदावर निवड झाली आहे. रविंद्र पाटील हा मूळचा नंदगाव या गावचा रहिवाशी असून तो अत्यंत गरीब, परिश्रम घेणारा अभ्यासू विद्यार्थी म्हणून सर्वांना परिचित आहे. तो अर्थशास्त्र या विषयात पदवीधर आहे. सन २०१५ ते २०२५ या कालावधीत त्याने करिअर कौन्सिलिंग सेंटरमध्ये बसून स्पर्धा परीक्षांची तयारी केली आहे.
त्याच्या या यशाबद्दल प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य तथा खानदेश शिक्षण मंडळाचे चिटणीस डॉ. अरुण जैन, सहचिटणीस डॉ. धिरज वैष्णव, डॉ. हर्षवर्धन जाधव, डॉ. आर. सी. सरवदे, डॉ. अमित पाटील, डॉ. कल्पना पाटील, डॉ. नलिनी पाटील, डॉ. वंदना भामरे, प्रा. वृषाली वाकडे, डॉ. माधव भुसनर, डॉ. रवी बाळसकर, प्रा. रोहन गायकवाड, डॉ. बालाजी कांबळे, यांच्यासह करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे, डॉ. जितेंद्र पाटील, दिलीप शिरसाठ, पराग पाटील, प्रा. हिमांशू गोसावी, प्रा. अमोल अहिरे, विशाल अहिरे, अतुल धनगर आदींनी अभिनंदन केले आहे.
