ढेकू रोडवरील क्रांतीपर्व स्मारक पुन्हा जैसे थे ; वादाची ठिणगी पडली

ज्यांच्याकडे करण्यासारखे काही उरलेले नाही, त्यांनी दुसऱ्याचे श्रेय लाटण्याचा हा प्रकार : श्याम पाटील

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ने नोंदविला निषेध

अमळनेर : सुरुवातीपासून स्मारकाचे कामात कवडीचाही सहभाग घेतला नाही, कोणतेही योगदान दिले नाही. अशा काही संधी साधू लोकांनी अनधिकृतपणे नगरपालिकेच्या वास्तूत बालिशपणा करत प्रवेश करुन स्मारकाचे लोकार्पण केले. आम्ही फार क्रांतीकारकांच्या प्रेमात आहोत, क्रांतीकारकांचा खूप आदर आहे असे भासविण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्याकडे करण्यासारखे काही उरलेले नाही, त्यांनी दुसऱ्याचे श्रेय लाटण्याचा हा प्रकार केलेला आहे. आयत्या बिळावर नागोबा बनण्याची त्यांची परंपरा आहे असे वक्तव्य माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

अमळनेर येथील ढेकू रोडवर इतिहासाचे क्रांतीपर्व म्हणून स्मारक उभारण्यात आले आहे. अमळनेर तालुक्याचा स्वाभिमान असलेल्या थोर क्रांतिकारकांचे पुतळे दीड दोन वर्षांपासूनउद्घाटनाच्या प्रतिक्षेत धूळ खात पडलेले आणि कपड्यात झाकून ठेवलेले होते . तोंडाला पट्ट्या लावून क्रांतिकारकांची मुस्कटदाबी होत होती. एकप्रकारे हा त्यांचा अवमान होत असल्याने जनतेला सहन होत नव्हते. असे सांगत यामुळे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून स्मारक जनतेसाठी खुले करण्यात आले होते. अमळनेेर वासियांना न्याय मिळाल्याचा आनंद घेत असताना मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी तेच पुतळे पुन्हा झाकून ‘जैसे थे’ केले.

उद्घाटनाच्या प्रतिक्षेतील क्रांतीकारकांचे झाकोळलेले स्मारक खुले करुन मिळाला अमळनेेर वासियांना न्याय

🟨 अमळनेर येथील ढेकू रोडवर इतिहासाचे क्रांतीपर्व म्हणून स्मारक उभारण्यात आले आहे. अमळनेर तालुक्याचा स्वाभिमान असलेल्या थोर क्रांतिकारकांचे पुतळे दीड दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत धूळ खात पडलेले आणि कपड्यात झाकून ठेवलेले होते . तोंडाला पट्ट्या लावून क्रांतिकारकांची मुस्कटदाबी होत होती. एकप्रकारे हा त्यांचा अवमान होत असल्याने जनतेला सहन होत नव्हते. असे सांगत यामुळे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून स्मारक जनतेसाठी खुले करण्यात आले होते.


ढेकू रोडवरील क्रांतीपर्व स्मारक पुन्हा जैसे थे ; वादाची ठिणगी पडली
ज्यांच्याकडे करण्यासारखे काही शिल्लक नाही, त्यांनी दुसऱ्याचे श्रेय लाटण्याचा हा प्रकार : श्याम पाटील
योगदान न देणाऱ्यांनी आयत्या बिळावर नागोबा बनू नये : श्याम पाटील
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ने नोंदविला निषेध

अमळनेर : येथील ढेकू रोडवरील क्रांतीपर्व स्मारकाचे प्रवेशद्वारावरील कुलूप तोडून नुकतेच खुले करण्याचा उतावीळपणा करणाऱ्याचे कोणतेही योगदान नाही. आयत्या बिळावर नागोबा बनण्याची त्यांची परंपरा आहे. या असंस्कृतपणा व विकृतपणाचा आम्ही निषेध करतो असे परखड वक्तव्य माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
क्रांतीपर्व स्मारकाचे लोकार्पणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संपर्क मंत्री, पालकमंत्री पात्र नाहीत. आम्ही साने गुरुजींची धडपडणारी मुले असून त्यासाठी आम्ही पात्र आहोत असे सांगत संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली काहींनी काल प्रभाग क्रमांक ७ मधील झाकोळलेले स्मारकाचे प्रवेशद्वारावरील कुलूप तोडून खुले करुन जनतेसाठी लोकार्पण केले. ही माहिती मिळताच वादाची ठिणगी पडली. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी ते पुन्हा झाकून ‘जैसे थे’ केले. यानंतर ढेकू रोडवरील फोर्टस् कार्यालयात माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी मराठा सेवा संघाचे प्रा. डॉ. लिलाधर पाटील, प्रा. डॉ. विलास पाटील, उपस्थित होते.

सुरुवातीपासून स्मारकाचे कामात कवडीचाही सहभाग घेतला नाही, कोणतेही योगदान दिले नाही. अशा काही संधी साधू लोकांनी अनधिकृतपणे नगरपालिकेच्या वास्तूत बालिशपणा करत प्रवेश करुन स्मारकाचे लोकार्पण केले. आम्ही फार क्रांतीकारकांच्या प्रेमात आहोत, क्रांतीकारकांचा खूप आदर आहे असे भासविण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्याकडे करण्यासारखे काही उरलेले नाही, त्यांनी दुसऱ्याचे श्रेय लाटण्याचा हा प्रकार केलेला आहे. आयत्या बिळावर नागोबा बनण्याची त्यांची परंपरा आहे असे वक्तव्य माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

अमळनेरच्या आजी माजी जनतेच्या करातून नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह उभारले आहे. या वास्तूवर काही लोक आयत्या बिळावर नागोबा होऊन बसले आहेत. त्याच प्रकारे आता स्मारक बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत का ? असाही प्रश्न आहे. स्मारकाचे लोकार्पण करायचेच होते तर नगरपालिकेशी पत्रव्यवहार केला का ? स्मारक उभारण्यासाठी योगदान देणाऱ्यांशी कधी चर्चा केली का ? स्मारकाचे उद्घाटन दमदारपणे तोलामोलाचे क्रांतीकारकांच्या उपस्थितीत केले असते. परंतु असे न करता स्मारकाचे थेट लोकार्पण करण्याचे काम ज्यांनी केले अशांचा आम्ही निषेध करतो. जनतेनेही त्यांना जाब विचारायला हवा.
…श्याम पाटील, माजी नगरसेवक

प्रा. डॉ. लिलाधर पाटील म्हणाले की, डॉ. उत्तमराव पाटील आणि लिलाताई यांचे स्मारक व्हावे याबाबत मराठा सेवा संघाने ठराव करुन श्याम पाटलांनी जागा सुचवून पालिकेमार्फत हे स्मारक उभारले. मात्र काम अपूर्ण आहे. प्रत्येक शिल्पाखाली क्यू आर कोड असेल त्याला स्कॅन करून सर्व घटनेचा इतिहास व व्हिडीओ पाहता येतील. डॉ. उत्तमराव पाटील आणि लिलाताई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पदयात्रा काढायला कां सुचले नाही ? आताच काही लोकांना काय पुळका आला ? लोकार्पण करताना कोणाची लायकी काढू नये. प्रत्येकाच्या कपाटात प्रत्येकाचे सांगाडे असतात. अनधिकृतपणे उद्घाटन करणे चुकीचे व निंदनीय आहे. मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड या कृतीचा निषेध करत आहे.
प्रा. डॉ. विलास पाटील म्हणाले की, अमळनेर ही क्रांती भूमी आहे. वास्तू साकारण्यासाठी श्याम पाटील पुढे आले. मराठा सेवा संघाच्या संकल्पनेतून निर्माण केलेले हे स्मारक आहे. काही गोष्टींची पूर्तता बाकी आहे. उतावीळ पणा न करता प्रोटोकॉल पाळले गेले पाहिजेत. डिजिटलायझेशन झाल्यावर लोकार्पण केले जाईल.
हे स्मारक वैशिष्ट्यपूर्ण योजनेचे ५० लाख आणि अमळनेर पालिकेचे २१ लाख रुपये अशा ७१ लाखांच्या निधीतून उभारले जात आहे. पालिकेकडे १२ लाख रुपये थकबाकी आहे. अद्याप डिजीटलायझेशन व फिनिशिंग बाकी आहे.
…राजन बाविस्कर, ठेकेदार.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!