मंगळवारी दि.२२ ला अमळनेर येथे होणार जिजाऊ रथयात्रेचे आगमन

रथ यात्रेसोबत महिलांची मोटरसायकल रॅली काढून सर्व स्मारक, थोर पुरुषांना अभिवादन करत बळीराजा चौकात होईल रॅलीचा समारोप.

अमळनेर : मराठा सेवा संघ संचलित मराठा जोडो अभियान अंतर्गत १८ मार्च ते १ मे २०२५ दरम्यान भोसले गढी वेरूळ ते लाल महाल – पुणे पर्यंत जिजाऊ रथ यात्रा काढण्यात येत आहे. मंगळवारी दि.२२ ला अमळनेर येथे जिजाऊ रथयात्रेचे आगमन होणार आहे. ही रथयात्रा मुक्ताईनगर, जळगाव, धरणगाव, टाकरखेडा मार्गे दि. २२ रोजी सकाळी ११ वाजता पैलाड येथे पोहचणार आहे. पैलाड येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, सानेगुरुजी पुतळा, शिवाजी महाराज नाट्यगृह, स्टेशन रोड, महाराणा प्रताप चौक, बळीराजा स्मारक या मार्गाने रथयात्रा जिजाऊ प्रवेशद्वार येथे येईल. पैलाड येथे मराठा समाज, मराठा सेवा संघ, मराठा महिला मंडळ त्याचप्रमाणे सर्व समाज महिला मंडळ यांच्या वतीने रथयात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.

पैलाड येथून रथ यात्रेसोबत महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात येऊन रस्त्यातील सर्व स्मारक, थोर पुरुषांना अभिवादन करण्यात येणार आहे. बळीराजा चौकात रॅलीचा समारोप होईल. त्यांनतर रथयात्रा मराठा मंगल कार्यालयात जाऊन पुढे मंगरूळ, जानवे, डांगर, चोपडाई मार्गे धुळे येथे रवाना होणार आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधव, महिला, जिजाऊ प्रेमींनी, शिव प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!