जळगाव : महाराष्ट्र राज्यभर अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी जळगाव जिल्हा युवासेना तर्फे कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कुलगुरूंना भेटून प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, जिल्हा सरचिटणीस राहुल पोतदार , जिल्हा समन्वयक जितेंद्र बारी, विद्यापीठ संपर्क अधिकारी अंकित कासार, विश्वजित पाटील, अविनाश पाटील, हरिलाल शिंदे व विद्यार्थी उपस्थित होते.