मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेतही प्राविण्य

अमळनेर : येथील भगिनी मंडळ शाळेची ई. १ ली ची विद्यार्थिनी कु. स्वरा राहुल पाटील हिने विविध स्पर्धा परीक्षांत राज्य पातळीवर यश संपादन केले. यात स्वराने इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवून यशाचा झेंडा रोवला. तिच्या या यशाबद्दल रोख रक्कम, स्कॉलरशिप, मेडल, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत राज्यात नववा तर जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवला तसेच एक्सेलेंट ऑलिम्पियाड फाऊंडेशन या परीक्षेत २०० पैकी १९० गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. कु. स्वराने विविध परीक्षांत राज्य पातळीवर क्रमांक प्राप्त केला आहे. ती जी. एस. हायस्कूल चे सेवानिवृत्त शिक्षक दिलीप बहिरम यांची नात आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला सोनवणे, रश्मी संवत्सरे, सविता देशमुख तसेच सर्व शिक्षिकांनी तिला मार्गदर्शन केले. तिच्या यशाबद्दल भगिनी मंडळ शाळेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!
