अमळनेर : मार्च २०२५ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल काल दिनांक १३ मे रोजी जाहीर झाला. यात अमळनेर तालुक्यातील विविध शाळांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. अमळनेर तालुक्यातील देवगाव येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल शाळेचा ९५.२३ %, जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, अमळनेर चा ९८.५५%, खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी. एस. हायस्कूल चा निकाल ९५.९७%, तर ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी संचलित व्हि . झेड. पाटील हायस्कूल, शिरूड चा निकाल १००% लागला आहे. यशवंत विद्यार्थ्यांचे शाळेतून व गावकऱ्यांकडून अभिनंदन होत आहे.
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगाव – देवळी

अमळनेर तालुक्यातील देवगाव येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल शाळेचा एकूण ९५.२३ % निकाल लागला आहे. कु. सोनाली पुरुषोत्तम महाजन या विद्यार्थिनीने ८७ टक्के गुण मिळवून वर्गात प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय रागिनी पाटील (८३.२० %), तृतीय मयुरी महाजन व पवन पाटील (८२.८० %), चौथ्या क्रमांकावर हर्षल कमलेश पाटील (८२.२० %) आणि पाचव्या क्रमांकावर राज दिलीप जाधव (८१.८० %) याप्रमाणे गुण प्राप्त केले आहेत. हा निकाल म्हणजे विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाचा परिणाम आहे.
महात्मा जोतीराव फुले हायस्कूलच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष विलासराव पाटील, सचिव आईसाहेब मंदाकिनी शांताराम पाटील आणि इतर संचालक मंडळाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय. आर. महाजन, एस. के. महाजन, एच. ओ. माळी आणि अरविंद सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी मार्गदर्शन केले.
जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, अमळनेर

जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, अमळनेेर शाळेचा एकूण निकाल ९८.५५% लागला आहे. कु. युतिका गोरख ठाकरे व कु. जयश्री अरविंद विरकर या विद्यार्थिनींनी ८९.२०% गुणांसह विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय क्रमांक लक्ष्य सुनिल लोहार (८७.६०%), तृतीय क्रमांक तन्वी राजेंद्र पवार (८७.२०%) गुण प्राप्त केले. संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी. पाटील, उपाध्यक्ष तथा प्राचार्य रावसाहेब के. डी. पाटील, खजिनदार दादासाहेब शैलेंद्र पाटील, सचिव मामासाहेब राधेश्याम पाटील, सदस्य बापूसाहेब एन. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करुन भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जी. एस. हायस्कूल, अमळनेेर

खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी. एस. हायस्कूल चा निकाल ९५.९७% टक्के लागला आहे. शाळेतून एकूण ३४८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतून लोकेश सुरेश वाल्हे व तन्मय विश्वनाथ चौधरी यांनी ९१ टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय हिमांशू विलास पाटील (८९.००%), तृतीय गौरव नितीन पाटील व केदार उमेश सूर्यवंशी (८८.८० %) गुण मिळविले आहेत. शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी तसेच खानदेश शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक व्ही. एम. पाटील, माजी मुख्याध्यापक बी. एस. पाटील, उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे, पर्यवेक्षक एस. आर. शिंगाणे, सी. एस. सोनजे, शिक्षक प्रतिनिधी आर. जे. पाटील, मुख्य लिपिक शाम पवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
व्हि .झेड.पाटील हायस्कूल, शिरूड चा निकाल १०० टक्के

ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी संचलित व्हि . झेड. पाटील हायस्कूल, शिरूड चा निकाल १००% टक्के लागला असून ३२ विदयार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी ३२ विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात, कु. रोहिणी नंदलाल कुंभार व निखिल रवींद्र माळी या दोघांनी (८९.६०%) गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय कु. आदिती दिलीप पाटील (८९.००%), तृतीय कु.भाविका प्रकाश पाटील (८८.६०%) गुण मिळविले. शालेय समिती अध्यक्षा श्रीमती पुष्पलता अशोक पाटील व सर्व सदस्य तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल शिवाजी सूर्यवंशी, सर्व शिक्षक बंधु भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विदयार्थी व पालकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
