गुणवंत शिक्षक पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

ज्या शिक्षकांची सेवा ५ वर्ष पुर्ण झालेली आहे असे शिक्षक या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवू शकतात.

जळगाव : महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेमार्फत दरवर्षी तात्यासााहेब ज्योतीराव फुले स्मृती दिनानिमित्त गुणवंत शिक्षक पुरस्कार दिले जातात. शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठीच्या गुणवंत शिक्षक पुरस्काराकरिता प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेेत. ज्या शिक्षकांची सेवा ५ वर्ष पुर्ण झालेली आहे असे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवू शकतात. प्राप्त प्रस्तावांतून निवडक शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०१९ असून शिक्षकांंनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सौ.प्रभावती बावस्कर व माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी.एन.पाटील यांनी केले आहे.

पुरस्कारासाठी प्रस्ताव सौ.प्रभावती बी.बावस्कर, द्वारा- भालचंद्र टी. बावस्कर, ५२५/२८, शंकर नगर, मुक्तांगण मंगल कार्यालयामागे, गणेशवाडी परिसर, जळगाव या पत्यावर पाठवावेत. आपल्या विभागातील संघटनेचे पदाधिकारी रावसाहेब जगताप (चाळीसगाव), बी.एन.पाटील (पाचोरा), प्रभावती बावस्कर (जळगाव), रणजित सोनवणे (जळगाव), सौ.छाया बैसाणे (चाळीसगाव), अजय भामरे (अमळनेर) यांंचेेेेकडेही प्रस्ताव पाठविता येतील.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!