
अमळनेर : शहरातील श्री मंगळ ग्रह मंदिरात यंदाही दरवर्षी प्रमाणे तुलसी विवाह महासोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तुळशीच्या कुंडीला साक्षात वधू राणीच्या वेषात सजविण्यात आले होते. विवाह मंडपात प्रतीक स्वरूपात भगवान श्रीकृष्णाचीही मूर्ती होती. मंदिर व परिसराला पाने, फुले, केळीचे खांब, रांगोळ्या व रोषणाईने सजविण्यात आले होते. सर्वांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.
पूजेच्या अकरा मानकऱ्यांमध्ये बाजार समितीचे व खा.शि. मंडळाचे संचालक हरी भिका वाणी मुख्य यजमान होते. पोलीस उपअधीक्षक राजेंद्र ससाणे, तहसीलदार संदीप वाघ , माजी नगरसेवक संजय पाटील, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वर्मा, ‘डीपीडिसी’चे सदस्य पंकज चौधरी, उपप्राचार्य प्रा. प्रवीण भावसार, प्रतिष्ठित व्यापारी दामुशेठ गोकलानी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब महाजन, जे. डी. कोठावदे, संजय सोनजे मानकरी होते. संजय एकतारे आणि सुनील वाघ यांनी वर व वधूच्या मामाची भूमिका निभावली. यावेळी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील व , जि. प.सदस्या जयश्री पाटील, अँंड. ललिता पाटील, तिलोत्तमा पाटील आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. मंदिराचे पुजारी प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले. त्यांना पुजारी तुषार दिक्षित व जयेंद्र वैद्य तसेच शहरातील काही पुरोहितांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीष कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव व सौ. जयश्री साबे सेवेकरी सौ. सुनीता कुलकर्णी, उज्वला शाह आदींनी परिश्रम घेतले.