भाविकांनी संतांच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

अमळनेर : येथील सुप्रसिद्ध भाविकांचे श्रद्धास्थान श्री स्वामीनारायण मंदिरात बीएपीएस संप्रदायाचे तीनशे संत दोन टप्प्यात येत असून त्यात आज सकाळी अकरा वाजता १५० संतांचे आगमन होत आहे. त्यामध्ये सनातनी हिंदू धर्मात ब्रह्मचर्य व्रताचे पालन कसे केले जाते ? त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे स्वामीनारायण संप्रदायात दाखल झालेले देशविदेशातून आलेले संत होय.
पहिल्या टप्प्यात आई वडिलांची एकुलती एक मुले २०, दोन भाऊ असलेले साधू २, अमेरिकेतून साधू बनण्यासाठी आलेले २०, मास्टर डिग्री प्राप्त २०, इंजिनियर्स झालेले ४०, एमबीए असलेले ४, पदवीधर असलेले ४४ असे एकूण १५० साधू येत असल्याने सर्व स्वामी नारायण ट्रस्टने तयारी केली आहे. दुसऱ्या टप्प्यात स्वामीनारायण संप्रदायाचे १५० संत येणार आहेत. अकराशे गुण अधिक संत स्वामी नारायण भगवान अक्षरब्रह्मगुणातीनंद स्वामी, भगतजी महाराज, शास्त्रीजी महाराज, योगीजी महाराज, प्रमुख स्वामी महाराज व वर्तमान काळी ब्रह्मस्वरूप परमपूज्य महंत स्वामी महाराजांचे आज्ञेत राहून सेवा देत आहे. तरी अमळनेरात येणाऱ्या संतांच्या दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खानदेशातील केदारी संत, पूज्य आनंदजीवन स्वामी, योगीस्नेह स्वामी, पूज्य अखंडमुनी स्वामी व अमळनेर सत्संग मंडळाने केले आहे.