निंभोरे व जवखेडे येथे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांची सदिच्छा भेट; ग्रामस्थांकडून स्वागत

अमळनेर : धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी नुकतीच तालुक्यातील जवखेडे गावी दत्त मंदीरात सदिच्छा भेट दिली. त्यांंनी मंदीरात दर्शन घेऊन प.पू. गुरुवर्य श्री संतोषपूरी गुरू बाळपूरी महाराज यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी गावातील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मुरा आप्पा, भिकन तात्या, शालिक जिभाऊ, प्रताप आबा पाटील, संजय झुलाल, जिजाबराव पाटील, बापू आत्माराम, सुरेश नाना पाटील, रविन्द्र देविदास, बापू धनगर पाटील, पोलीस पाटील, उल्हास बापू लांडगे यांनी त्यांचे स्वागत केले. प्रा.शरद पाटील यांचे सोबत माजी नगरसेवक भोलाभाऊ वाघ, जुने कुस्तीगीर वस्ताद चंद्रकांत नाना सैंदाणे व बाबा नाईक पहेलवान व गोपी लांडगे हे उपस्थित होते.

यापूर्वी अमळनेर तालुक्यातील निंभोरे येथे मा. उपसरपंच व पत्रकार समाधान भाऊसाहेब यांचे निवासस्थानी प्रा.शरद पाटील व मान्यवरांचा ज्येष्ठ नागरिक निंबा आप्पा धनगर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी समाधान धनगर, सुभाष रावसाहेब, संजय मुरलीधर धनगर आदी उपस्थित होते. भेटीत प्रा.शरद पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!