प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी पदी गोपाळ साळुंखे यांनी स्विकारला पदभार

जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची नाशिकला बदली

धुळे (जिमाका वृत्तसेवा) : येथील जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची नाशिक येथे बदली झाली आहे. त्यांना आज कार्यालयातील सहकाऱ्यांनी निरोप दिला. जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नाशिक जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे यांनी आज मावळते जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांच्याकडून पदभार स्वीकारला.

श्री. बोडके यांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांची आता नाशिक येथे बदली झाली आहे. तसेच जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांना पत्रकार, छायाचित्रकार बांधवांनी निरोप दिला. यावेळी कार्यालयीन कर्मचारी, पत्रकार, छायाचित्रकार, विविध दैनिकांचे संपादक उपस्थित होते. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!

०००००

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!