अमळनेर : येथील सिंधी कॉलनी परिसरात श्री झुलेलाल व श्रीराम रथाचे उत्सवात पुज्य सिंधी जनरल पंचायत, शहर पंचायत व सिंधी समाजबांधव यांनी स्वागत केले. रथासोबत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व सत्कारही यावेळी करण्यात आला. सिंधी समाज बांधवांनी श्री झुलेलाल व श्री राम रथाच्या दर्शनाचा लाभ घेतला. हिंदू-सिंधू तिर्थ स्थान तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. जळगाव शहरात प्रथमच श्री झुलेलाल साईं ९१ फूट व प्रभू श्रीराम भगवान १०१ फुट ऊंच मूर्ती स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. आठ एकर जागेमध्ये मंदिर बांधण्यात येणार आहे.
यावेळी जय झुलेलाल गृप व पंडीत संजय शर्मा,पंडीत किशन शर्मा, भाई जितेन्द्र तोलानी, राजकुमार कोरानी, हरेश शामनानी, हसमूख सैनानी, मोहन सैनानी, राजेश कूंदनानी, नरेश तोलानी, अमर माधवानी, कैलास नागदेव, संजय हिंदूजा, धन:शाम थदानी, सूनिल बठेजा, रोहित बठेजा व झूलेलाल भक्त मोठया संख्येने उपस्थित होते. अमळनेर शहरात रथाला आणण्यासाठी सिंधी समाजाचे समाजसेवक प्रकाश जग्यानी यांनी मेहनत घेत समाजाला जागृत केले.