प्रा.डॉ.अरविंद सराफ यांचे वृद्धापकाळाने निधन

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अरविंद गोपाळदास सराफ यांचे आज दिनांक १८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ८९ वर्षाचे होते.

प्रा. सराफ हे मंगळदेव मंदिर मंडळाचे संस्थापक, सराफ असोसिएशनचे अमळनेर चे माजी अध्यक्ष, अमळनेर सिनियर सिटीझन क्लबचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांची अंत्ययात्रा आज बुधवार दिनांक १९ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या न्यू प्लॉट, शिवाजी महाराज उद्यान समोरील राहत्या घरापासून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन व नातवंडे असा परिवार आहे. इंजि. मिलिंद सराफ यांचे ते वडील तर डॉ. संदीप सराफ यांचे काका होत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!