
अमळनेर : देशमुखवाडा येथील रहिवासी रावसाहेब मल्हारराव देशमुख यांचे आज रात्री हृदयविकाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते एक्कावन्न वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५ वाजता राहते घर देशमुख वाडा येथून निघणार आहे. त्यांच्या मागे पत्नी दोन मुले भाऊ असा परीवार आहे. शहादा नगरपालिकेत कार्यरत असलेले प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख ह्यांचे ते लहान बंधू होत. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने मित्र परीवार व कुंटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे.