तालुका काँग्रेस तर्फे पंडीत जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिन साजरा

अमळनेर : येथील तालुका काँग्रेस तर्फे मुन्नाभाऊ शर्मा यांच्या वाड्यात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बालदिनानिमित्त बालिका शरयु वाघ च्या हस्ते बाल गोपालांना पेढे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमावेळी अमळनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ पाटील, शहराध्यक्ष मनोज पाटील, जिल्हा महिलाध्यक्षा सुलोचनाताई वाघ, अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस सरचिटणीस रज्जाकभाई शेख, दलित नेते रामभाऊ संदानशिव, माजी काँग्रेस शहराध्यक्ष मुन्नाभाऊ शर्मा, नगरसेवक सलीम टोपी, अर्बन बँकेचे संचालक प्रविणभाऊ जैन, माजी नगरसेवक राजू फाफोरेकर, अल्पसंख्याक प्रमुख अलीम मुजावर, शहर काँग्रेस उपाध्यक्ष राजाभाई शेख, अहमद पठाण, कैलास पाटील, प्रा.विश्वनाथ ठाकरे, युवक नेता सईद तेली, जेष्ठ कांग्रेस सदस्य शफी पहेलवान, डबीर पठाण, नरेंद्र परदेशी, गोकुळ आबा वाघ, बी.के. सुर्यवंशी, फोटोग्राफर नियाज शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!