उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

अमळनेर : औरंगाबाद येथील एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवनगौरव सार्वजनिक वाचनालय या शासनमान्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी राज्यस्तरीय जीवनगौरव शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. यंदा राज्यातील ५१ शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला असून त्यात अमळनेरचे उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय बारकू सोनवणे यांचाही समावेश आहे.

येत्या १३ जानेवारी २०२० रोजी औरंगाबाद येथील तापडिया नाट्यमंदिरात पुरस्काराचे वितरण होणार आहेे. सोनवणे हे जळगाव जिल्ह्यातील जि.प.शाळा, पिंगळवाडे ता.अमळनेर येथे कार्यरत आहेत. शालेय गुणवत्ता वाढीसाठी नवोपक्रम, विविध उपक्रमांतर्गत जनजागृती कार्यक्रम यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!