
धुळे : कवठळ ता. एरंडोल (जि. जळगाव) येथील मूळ रहिवासी व सध्या धुळ्यात वास्तव्यास असलेले गोविंदराव शहादू पाटील उर्फ जी.एस.आबासाहेब यांनी मरणोत्तर देहदान केले. मंगळवार, ता.२६ नोव्हेंबर रोजी तळेगाव (पुणे) येथील हरणेश्वर क्लिनिक येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार, तळेगाव येथील “मायमर मेडीकल कॉलेज” येथील विद्यार्थ्यांच्या हितास्तव त्यांच्या देहाचे दान करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी मिनाक्षी गोविंदराव पाटील व परिवार आहे. शनिवारी, ३० नोव्हेंबर रोजी त्यांचे धार्मिक विधी धुळ्यात जितेंद्रनगर येथे सकाळी नऊ वाजता होतील. गोविंदराव पाटील यांनी जळगावमध्ये भूविकास बँकेचे लेखा अधिकारी, कासोदा येथील वसंत साखर कारखान्यात सेक्रेटरी, जालना जिल्हा बँकेचे जनरल मॅनेजर तसेच शिखर बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले होते. सहकार क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव होता.